अरे बापरे, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

उत्तराखंडमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचावकार्य अधिक वेगानं सुरू करण्यात आलंय. केदारनाथ आणि गौरीकुंडच्या दरम्यान अडकून पडलेल्या १००० यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येतेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 22, 2013, 07:16 PM IST

www. 24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तराखंडमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचावकार्य अधिक वेगानं सुरू करण्यात आलंय. केदारनाथ आणि गौरीकुंडच्या दरम्यान अडकून पडलेल्या १००० यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येतेय.
१६ तारखेच्या पुरात सर्वाधिक नुकसान झालेल्या प्रदेशात हे यात्रेकरू अडकलेत. उत्तरकाशीमधून १७ परदेशी पर्यटकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलंय. आतापर्यंत मृतांचा आकडा ५५०च्या घरात पोहोचलाय, तर सुमारे ४० हजार लोक अद्याप अडकून पडलेत. त्यांना वाचवण्यासाठी लष्कर आणि अन्य सरकारी यंत्रणा जोमानं कामाला लागल्यात.

दरम्यान, अडकून पडलेल्यांपर्यंत सर्वतोपरी मदत पोहोचवण्याचं काम लष्कराचे जवान करतायत. कपडे, औषधं पोहोचवण्याबरोबरच या यात्रेकरूंसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आलीये.राज्यातले शेक़डो पर्यटक अद्याप उत्तराखंडमध्ये अडकून पडलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.