चेन्नई: गायीचं हृदय आणि ते ही एका महिलेच्या छातीत. हो हे खरं आहे... गायीच्या हृदयापासून बनलेल्या वॉल्वमुळं एका महिलेला नवं जीवन मिळालंय. हैदराबादची राहणारी ही महिला वय 81 वर्ष आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिलेच्या हृदयातील वॉल्व संकुचित पावला होता. ज्यामुळं श्वास घेण्यात त्यांना त्रास व्हायचा. नंतर चेन्नईतील एका हॉस्पिटलमध्ये शनिवारी महिलेचं ऑपरेशन केलं गेलं. महिलेचं हे अनोखं ऑपरेशन करणारे कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर आ. अनंतरमन यांच्या मते ही प्रक्रिया पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीचा विकल्प आहे. ज्या रुग्णांच्या हृदयातील वॉल्व संकुचित पावतात त्यांसाठी ही सर्जरी उपयुक्त ठरू शकते.
11 वर्षांपूर्वी सुद्धा या महिलेच्या हृदयाचा वॉल्व बदलला होता. पारंपरिक पद्धतीत जुना वॉल्व काढून नवा वॉल्व लावला जातो. मात्र महिलेचं वय लक्षात घेता तसं करणं योग्य ठरलं नसतं. अशात कमी रिस्क घेत हा पर्याय चांगला ठरला.
मग डॉक्टरांनी गायीच्या हृदयाचे टिशूपासून बनवलेला बायो-प्रोस्थेटिक वॉल्व बनवला आणि तो महिलेच्या हृदयाशी जोडला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.