नवी दिल्ली : चुकून पाकिस्तान गेलेले धुळ्यातील जवान चंदू बाबुलाल चव्हाण यांच्या सुटकेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलंय.
सध्या सीमेवर तणावाचं वातावरण असलं तरी योग्य प्रक्रियेनुसार चव्हाण यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरु झाल्याचं पर्रिकरांनी सांगितलंय. चंदू चव्हाण जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती पूंछ सेक्टरमध्ये ३७ बटालियनमध्ये कार्यरत असताना चुकून ते पाकिस्तानच्या सीमेत घुसले.
या घटनेमुळे चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. याची परिसीमा म्हणजे ही बातमी ऐकून चंदूंचा लहानपणापासून सांभाळ करणाऱ्या त्यांच्या आजीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.