असे केल्यास तुमचे ४ लाख ४४ पर्यंत उत्पन्न होणार करमुक्त

 केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१४-१५ वर्षाचे बजेट सादर केले त्यात पर्सनल इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. परंतु, काही अशा काही गोष्टी केल्या आहेत त्याने तुमचा टॅक्स ४ लाख ४४ हजार २०० पर्यंत वाचू शकतो

Updated: Mar 1, 2015, 03:11 PM IST
असे केल्यास तुमचे ४ लाख ४४ पर्यंत उत्पन्न होणार करमुक्त title=

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१४-१५ वर्षाचे बजेट सादर केले त्यात पर्सनल इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. परंतु, अशा काही गोष्टी केल्या आहेत त्याने तुमचा टॅक्स ४ लाख ४४ हजार २०० पर्यंत वाचू शकतो

१) २.५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त 
२) नॅशनल पेन्शन स्किम : करमुक्त मर्यादा १ लाखवरून १.५ लाख 
३) ५० हजार रुपये पेन्शन ८० सी अंतर्गत करमुक्त
४) ट्रान्सपोर्ट भत्ता प्रति महिना ८०० रुपयांवरून १६०० रुपये करण्यात आला. = १९२०० (अंडर ८० डी) 
५) हेल्थ इन्शूरन्स प्रिमिअम कपात १५ हजारावरून २५ हजार करण्यात आली ( मेडिकल रिएम्बर्समेंट) = १० हजारांची वाढ 
६) हेल्थ इन्शुरन्स प्रिमिअम कपात ( वरिष्ठ नागरीक) १० हजारवरून ३० हजार करण्यात आली ( मेडिकल रिएम्बर्समेंट)  = फायदा २० हजार रुपये 
७) सुकन्या समृधी स्किममधील गुंतवणूक करमुक्त 
८) होमलोन रिपेमेंट २ लाखांपर्यंत करमुक्त
९) ८० सी अंतर्गत करमुक्त १.५ लाख रुपये करमुक्त 

 

पैसा लावा, पैसा वाचवा 

80 C

1,50,000 रुपये 

80CCD

50,000 रुपये 

होम लोन व्याज

2,00,000 रुपये 

80D हेल्थ इन्शूरन्स

25,000 रुपये 

टान्सपोर्ट अलाऊन्स 

19200 रुपये

एकूण 

4,44,200 रुपये

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.