www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
वायु सेनेचे अधिकारी रमेश चंद्रा यांची दिल्लीत हत्या करण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांचा खून त्यांच्या पत्नीनच तिच्या अल्पवयीन प्रियकरासोबत केल्याचं उघड झालंय. त्यामुळे परिसरात खळबळ उडालीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश चंद्रा हे दिल्ली छावनीच्या सुब्रतो पार्क भागातील वायू सेनेकडून मिळालेल्या सरकारी घरांत आपल्या पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीसोबत राहत होते. रमेश चंद्रा (40 वर्ष) आणि सुधा चंद्रा (28 वर्ष) यांचा 2008 साली विवाह झाला होता. ही काही वर्षांपासून रमेश यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांसोबत खूश नव्हती. पतीला दारुचं व्यसन लागल्यानं त्यांच्यामध्ये अनेकदा खटके उडत होते. यातच, तिचे एका वायूसेनेच्याच कर्मचाऱ्याच्या 17 वर्षांच्या मुलासोबत सूत जुळले. आपल्या प्रेम संबंधातील अडचण दूर करण्यासाठी सुधानंच आपल्या प्रियकरासोबत आपल्या पतीची हत्या केली.
आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी सूधा आणि तिच्या अल्पवयीन प्रियकरानं रमेश चंद्रा यांचा गळा दाबून खून केला. हा खून १० एप्रिलला झाला. या दिवशी रमेश चंद्रा सकाळपासूनच दारू पिण्यात गुंग होते. काही तासानंतर त्यांना दारू चढली. यानंतर सुधाने आपल्या प्रियकारासोबत मिळून रमेश यांचा खून केला, असं पोलिसांनी म्हटलंय.
सुधानं आणि तिच्या प्रियकरानं रमेश यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं भासवण्यासाठीही प्रयत्न केले होते. पण, पोस्टमॉर्टेमचा अहवाल तपासल्यानंतर आणि योग्य तपास घेतल्यानंतर पोलिसांनी सुधाला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. सध्या सुधाच्या अल्पवयीन प्रियकराची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.