लज्जास्पद : प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये कंडक्टरने महिलाला निर्वस्त्र करून घेतली झडती

 मध्यप्रदेशातील सिंगरौलीमध्ये चालत्या बसमध्ये एका कंडक्टरने महिलेला निर्वस्त्र करून झटती घेण्याच्या लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. बस प्रवाशांनी खचाखच भरली असताना हा प्रकार घडला. 

Updated: Oct 27, 2015, 09:33 PM IST
लज्जास्पद : प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये कंडक्टरने महिलाला निर्वस्त्र करून घेतली झडती title=

रिवा :  मध्यप्रदेशातील सिंगरौलीमध्ये चालत्या बसमध्ये एका कंडक्टरने महिलेला निर्वस्त्र करून झटती घेण्याच्या लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. बस प्रवाशांनी खचाखच भरली असताना हा प्रकार घडला. 

घटना नवानगर जवळी आहे. पीडित महिलेने आपला एक वर्षांचा मुलगा जयंतसह बसमध्ये प्रवेश केला. या दरम्यान २२०० रूपयांची चोरी झाली. यानंतर कंडक्टरला महिलेवर संशय आला. 

महिला आपण निरपराध असल्याच्या विनवण्या करत होती. पण कंडक्टरने एक नाही ऐकले. त्यानंतर कंडक्टरने झटती घेण्याच्या बहाण्याने महिलेचे कपडे उतरविण्यास सांगितले. 

महिला रडत होती. पण कंडक्टर ऐकत नव्हता, त्याने प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये आपल्या एक वर्षाच्या मुलासमोर एक एक कपडे काढला आणि आपण निर्दोष असल्याचे सिद्ध केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे सुरू असताना बसमधील एकही प्रवासी महिलेच्या मदतीला धावला नाही. 

संपूर्ण झडती झाल्यानंतर अपमान गळत महिला पुढील स्टॉपवर उतरली आणि आरोपी कंडक्टर विरोधात तक्रा दाखल केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.