रायपूर : पाठ्य पुस्तकातील धड्यांचा मजकूर हा देशातील पुढील पिढी घडवत असतो, बालपणापासून किशोरवयापर्यंत देण्यात आलेले धडे पुढे देशाचं भवितव्य घडवतात असं म्हटलं जातं.
मात्र भाजपचं सरकार असलेल्या छत्तीसगड सरकारच्या शालेय पाठ्यपुस्तकात काही वेगळंच छापण्यात आलं आहे. यामुळे समस्त महिला वर्गाचा संताप होणार आहे.
शालेय पाठ्यपुस्तकात वादग्रस्त वाक्य
पाचवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातील एका धड्यात लिहिलं आहे, 'नोकरी करणाऱ्या महिला, हे देशातील बेरोजगारीचं आणखी एक कारण आहे.'
या विरोधात २४ वर्षाच्या सौम्या गर्ग यांनी छत्तीसगड राज्याच्या महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. पाचवीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात, आर्थिक अडचणी आणि आव्हानं या धड्यात हिंदीत लिहिलंय, 'स्वातंत्र्यानंतरच्या काळात बेरोजगारी वाढत गेली, कारण महिला नोकरी करायला लागल्या.
सौम्या गर्ग यांनी महिन्याभरापूर्वी छत्तीसगड राज्याच्या महिला आयोगाकडे याविषयी तक्रार केली आहे. यावर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा हर्षिता पांडेय म्हणाल्या, याविषयी आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी पत्र लिहिणार आहोत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.