नवी दिल्ली : येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणारे स्वराज अभियानेच नेते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी यादव यांना नोटीस पाठवून मैदान खाली करण्याचे बजावले होते. मात्र, आंदोलन सुरु असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
योगेंद्र यादव हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. या नोटीसीला त्यांनी उत्तर दिले नाही. रात्री उशीरा त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप त्यांनी केलाय.
योगेंद्र यादव यांनी याबाबत ट्विट केले. या घटनेची माहिती मिळताच योगेंद्र यादव यांचे सहकारी प्रशांत भूषण आणि इतर कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झालेत. योगेंद्र यादव यांना कोणत्या कलमांखाली ताब्यात घेण्यात आले आहे, अशी विचारणा प्रशांत भूषण यांनी पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांनी त्यांना माहिती देण्यात नकार दिला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी तिथेच ठिय्या मांडला. मंगळवारी सकाळी पोलीसांनी यादव आणि ताब्यात घेतलेल्या इतर कार्यकर्त्यांची सुटका केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.