अर्धनग्न महिलांचे पुतीनसमोर आंदोलन!

रशियाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्लादीमीर पुतीन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर बाहेर पडल्यावर धक्काच बसला. त्याच्या सरकारवर नाराज असलेल्या महिलांनी अर्धनग्न अवस्थेत मतदान केंद्रावर हल्लाबोल केला.

Updated: Mar 5, 2012, 06:41 PM IST

www.24taas.com, मॉस्को

रशियाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्लादीमीर पुतीन यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर बाहेर पडल्यावर धक्काच बसला. त्याच्या सरकारवर नाराज असलेल्या महिलांनी अर्धनग्न अवस्थेत मतदान केंद्रावर हल्लाबोल केला.

अधिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या या महिला कार्यकर्त्या होत्या, असे रशियाच्या टुडे टेलिव्हिजन नेटवर्कने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

या अर्धनग्न महिलांनी मतदान केंद्रातून मत पेट्याही पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या छातीवर मोठ-मोठ्या अक्षरात लिहिले होते की, मी पुतिनसाठी चोरी करणार आहे. पुतीन समर्थक मतदारांनो आकृष्ट करण्यासाठी महिलांच्या सौंदर्याचा वापर करतात, असा आरोपही यावेळी लावण्यात आला.

महिला कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात आपले ओव्हर कोट काढून पुतीन यांच्या विरोधान घोषणाबाजी केली. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले.

फ्रेमेन असे या संघटनेचे नाव असून २००८मध्ये याची स्थापना झाली होती. यापूर्वीही या महिला कार्यकर्त्यांनी महिलांच्या प्रश्नावर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले होते. फ्रेमेनने युक्रेनमधील वाढत्या सेक्स पर्यटनाविरोधातही आवाज उठविला आहे.