टोकियोमध्ये १ वर्षाचं पेंग्विन हरवलं

जपानमधल्या टोकियो सी लाईफ पार्कमधून निसटलेल्या एका पेंग्विनचा सध्या कसून शोध घेतला जात आहे. एक वर्ष वयाचा हा हम्बोल्ट पेंग्विन कुठल्या मार्गानं निसटला असावा यावर सध्या बरीच खलबतं चालली आहेत.

Updated: Mar 10, 2012, 04:20 PM IST

www.24taas.com, टोकियो

जपानमधल्या टोकियो सी लाईफ पार्कमधून निसटलेल्या एका पेंग्विनचा सध्या कसून शोध घेतला जात आहे. एक वर्ष वयाचा हा हम्बोल्ट पेंग्विन कुठल्या मार्गानं निसटला असावा यावर सध्या बरीच खलबतं चालली आहेत.

हा पेंग्विन रॉक वॉल ओलांडून गेला असावा, असा टोकियो सी लाईफ पार्कचे डेप्युटी डायरेक्टर काझुहिरो साकामोटो यांच्या टीमचा अंदाज आहे. अर्थात १ वर्षाचा पेंग्विन १३ फूट उंट राँक वॉल कसा ओलांडून जाईल, हेही एक आश्चर्यच मानलं जातंय. यंग पेंग्विन जिज्ञासा आणि साहसाच्या भरात असं करू शकतात.

मात्र, गेले काही दिवस त्याचा काहीच पत्ता लागत नसल्यानं सगळेच हवालदिल झालेत. आजूबाजचं पाणी फारच घाणेरडं असल्यानं पेंग्विनचा जीवही जाऊ शकतो, अशी चिंता सी लाईफ पार्कच्या कर्मचाऱ्यांना वाटत आहे