पाकिस्तानकडे ११० अण्वस्त्रांचा साठा

पाकिस्तानकडे ११० अण्वस्त्रं असल्याचं तसंच मागील वर्षात अण्वस्त्रसज्जतेसाठी २,२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स त्यावर खर्च करण्यात आल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय स्वंयसेवी संस्थेने केला आहे.

Updated: Mar 8, 2012, 10:29 AM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

 

पाकिस्तानकडे ११० अण्वस्त्रं असल्याचं तसंच मागील वर्षात अण्वस्त्रसज्जतेसाठी २,२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स त्यावर खर्च करण्यात आल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय स्वंयसेवी संस्थेने केला आहे. पाकिस्तान सरकारने ही अतिशयोक्ती असल्याचं म्हटलं आहे.

 

इंटरनॅशनल कॅम्पेन टू ऍबोलिश न्युक्लिअर वेपन्स आयसीएएन या संस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये पाककडे ९० ते ११० अण्वस्त्रं नमुद केलं आहे. तसंच २००८ साली ६० ते ८० अण्वस्त्र होती त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालं असल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

 

पाकिस्तान येत्या पाच ते दहा वर्षात अण्वस्त्रांचा साठा दुप्पट करण्याचा प्रयत्न करेल असं सूत्रांच्या हवाला देऊन या रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आलं आहे. पाकिस्तानने २०१० साली अण्वस्त्र कार्यक्रमावर १.८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक करण्यात आली त्यात वाढ करुन मागील वर्षात २.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्चे केले.

 

पाकिस्तान परराष्ट्री मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या रिपोर्टमधील दाव्यांचे खंडन केलं आहे आणि हा पाक विरोधात अपप्रचार असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तान सरकारचा प्राधान्यक्रम लोककल्याण आणि देशाच्या आर्थिक विकास हा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच दक्षिण आशिया किंवा जगात कुठेही शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेला पाकिस्तानचा विरोध असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.