येमेन हवाई हल्ला, १३ भारतीय जिवंत

सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्यात किती जण ठार झालेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. १३ भारतीय जिवंत असून ७ जण बेपत्ता असल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आलेय.

PTI | Updated: Sep 9, 2015, 04:53 PM IST
येमेन हवाई हल्ला, १३ भारतीय जिवंत  title=
( छाया - AFP)

साना : सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्यात किती जण ठार झालेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. १३ भारतीय जिवंत असून ७ जण बेपत्ता असल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आलेय.

सौदी अरेबियाने येमेनमधील होदेइदाह बंदरावर हवाई हल्ला चढवला. यात २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही, असे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले. 

येमेन हल्यात २० भारतीय ठार झाल्याची प्राथमिक माहिती मंगळवारी रात्री मिळाली होती. मात्र, परराष्ट्र खात्याने या आकड्याला दुजोरा दिलेला नाही. मात्र, या हल्ल्यात १२ शियापंथीय बंडखोर ठार झाल्याचे येमेनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.