हंगेरी : युरोपमधील शरणार्थी वाद गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये आहे. या वादात काही अशा घटना घडल्या त्यातून अनेक वाद आणि चर्चा सुरू झाल्या आहे. हंगेरी आणि मॅसेडोनिया यांच्या सीमेवरील लष्कर आणि शरणार्थी यांच्यातील हिंसाचारांच्या घटनाही समोर येत आहेत.
Far-right camerawoman kicking #refugees is called Petra László. Unbelievable! Pics by 444.hu #Hungary #refugeecrisis pic.twitter.com/jplYWb7MX5
— Szabolcs Panyi (@panyiszabolcs) September 8, 2015
या एक धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये हंगेरीचे एन१ टीव्ही नावाच्या चॅनलची एक कॅमेरावुमनने शरणार्थींना लाथ मारून पाडले आणि पडलेल्या माणसाचे दृश्य कॅमेऱ्यात टीप होती. पण तीचे हे कृष्णकृ्त्य दुसऱ्या कॅमेऱ्यात टीपले जात होते.
शरणार्थी रजिस्ट्रेशन कॅम्पमधून पळत असताना त्यांच्या पायात पाय अडकवून या कॅमेरावुमनने पाडले.
दरम्यान या कॅमेऱावुमनला केलेल्या प्रकाराबद्दल दोषी मानून निलंबित करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.