१६ चीनी नागरिकांना घुसखोरी करताना अटक

भारत-चीन सीमा अनधिकृतरित्या ओलांडून भारतात घुसखोरी करण्याऱ्या १६ चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुसंख्य तिबेटमधील नागरिक आहेत.

Updated: Oct 17, 2013, 06:48 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, ईटानगर
भारत-चीन सीमा अनधिकृतरित्या ओलांडून भारतात घुसखोरी करण्याऱ्या १६ चीनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी बहुसंख्य तिबेटमधील नागरिक आहेत.
गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे एका पीएलए सैनिकासह चीनच्या चार नागरिकांना अटक करण्यात आली. औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अरुणाचल प्रदेशच्या विविध भागांतून तिबेटच्या सहा नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांनी आम्ही दलाई लामा यांना भेटण्यासाठी आल्याचे सांगितले.
‘यार्चा गम्बो’ ही औषधी वनस्पती शोधण्याच्या उद्देशाने भारतीय हद्दीत घुसलेल्या चीनच्या आणखी तीन नागरिकांनाही अटक केली आहे. यापैकी सात जणांना तवांग येथे फ्लॅग मिटिंगच्या वेळी चीनच्या अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आले तर सहा जणांना सुरक्षा रक्षकांनी पुन्हा चीनमध्ये हाकलून दिले आहे.
दरम्यान, अबरी भाषेतील राजकीय नकाशा बाळगणाऱ्या चीनच्या तीन नागरिकांना लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अटक करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.