न्यूयॉर्क : तीन महिन्यांचे बाळ बोलल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? मात्र, हा चमत्कार अमेरिकत झालाय. अमेरिकेतील एका तीन महिन्याच्या बाळाने ही अशक्य गोष्ट बोलून दाखवली आहे.
या बाळाने चक्क आपल्या वडिलांना 'आय लव्ह यू' म्हटले. बाळाच्या बाबाने त्याला आय लव्ह यू म्हटले, लगेच त्यानेही क्षणाचा वेळ न लावता आय लव्ह..म्हटले. या बाळाचा व्हिडियो सध्या यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे.
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना इथे राहणाऱ्या टेड मोस्कालेंको या दाम्पत्यांनी हा व्हीडियो यू-ट्यूबवर शेअर केला आहे. माझ्या मुलगा बेन याच्याबरोबर मी सकाळपासूनच खेळत होतो. खेळता खेळता त्याला आय लव्ह यू म्हणालो. तर त्याने माझी नक्कल करत अगदी तशाच पद्धतीने आय लव्ह यू , असे म्हटले असे टेड यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.