सिंगापूर : ब्लॉगवर पंतप्रधानांवर चुकीचे आणि निराधार आरोप लावल्याने एका युवकाला तब्बल ७० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. युवकाने एका घोटाळ्यात पंतप्रधानांचा हाथ हसल्याचा आरोप लावला होता. त्यामुळे कोर्टाने या निराधार आरोपाविरोधात युवकावर दंड लावला आहे.
रॉय नंग या युवकाने पंतप्रधान ली शीन लूंग यांच्यावर प्रोविडंट फंडमध्ये अनेक कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप लावला होता. प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायाधीशांनी म्हटलं की, रॉयला सरकारच्या सीपीएफ नितीवर टीका करायची होती पण त्याने पंतप्रधानांना चोर म्हटलं त्यामळे त्याला 70 लाख रुपये द्यावे लागतील.