वॉशिंग्टन : भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दहशतवादी कारवायाप्रकरणी पाकिस्तानला दम भरला असताना मात्र, तालिबानला क्लिनचिट दिलाय. त्यामुळे अमेरिकेने पलटी मारल्याचे दिसून येत आहे. अफगाणमधील तालिबानी दहशतवादी नाहीत, असे आश्चर्यकारक विधान अमेरिकेने केलेय.
तालिबान हे एक सशस्त्र बंड आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) हा दहशतवादी गट आहे. त्यामुळे आम्ही दहशतवादी गटांना कोणत्याही सवलती देणार नाही, असे व्हाइट हाऊसचे उप माध्यम सचिव एरिक स्कल्झ यांनी म्हटले.
एका पत्रकार परिषदेत तालिबान एक दहशतवादी गट आहे का, असे त्यांना दुसऱ्यांदा विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, मला तसे वाटत नाही. तालिबान हे एक सशस्त्र बंड आहे. अमेरिका अफगाण तालिबानला एक दहशतवादी संघटना मानत नाही. इस्लामिक स्टेटला मात्र दहशतवादी गट संबोधले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.