अमेरिकन दूतावासावर `अल कायदा`ची वक्रदृष्टी

‘अल कायदा’ने अरब जगात आणि अमेरिकी स्थानांवर हल्ला करणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, अमेरिकेने सुदान आणि ट्युनिशियामधील आपल्या दूतावासामधील अनावश्यक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरूवात केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 16, 2012, 05:11 PM IST

www.24taas.com, दुबई
‘अल कायदा’ने अरब जगात आणि अमेरिकी स्थानांवर हल्ला करणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, अमेरिकेने सुदान आणि ट्युनिशियामधील आपल्या दूतावासामधील अनावश्यक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरूवात केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरब राष्ट्रांमधील अल कायदा संस्थेने पश्चिम एशिया तसंच आफ्रिकेतील अमेरिकन दूतावासांवर आणखी हल्ला करण्याचं आवाहन केलं आहे आणि पश्चिमी राष्ट्रांतील मुस्लिमांना अमेरिकेच्या हितांवर हल्ला करावा असंही सांगितलं आहे..
अमेरिकन विदेश विभागाने परिस्थितीचा विचार करत सगळ्या अनावश्यक कर्माचाऱ्यांना सुदान आणि ट्यूनिशिया सोडण्याचं आवाहन केलं आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला झाला होता. इस्लाम धर्मावर काढलेल्या वादग्रस्त अमेरिकन सिनेमामुळे अरेबियन राष्ट्रांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी लिबियातील अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्यात अमेरिकन राजदूतांसह तीन जणांचा मृत्यू झाला होता.