इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचं निधन

द किंग ऑफ इस्रायल`, `द लायन ऑफ गॉड` या बिरुदावल्या मिरवणारे इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचे शनिवारी निधन झालं ते ८५ वर्षांचे होते. २००६ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आठ वर्षांपासून ते कोमात गेले होते.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 12, 2014, 10:46 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, जेरुसलेम
द किंग ऑफ इस्रायल`, `द लायन ऑफ गॉड` या बिरुदावल्या मिरवणारे इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन यांचे शनिवारी निधन झालं ते ८५ वर्षांचे होते. २००६ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आठ वर्षांपासून ते कोमात गेले होते.
इस्रायलच्या स्वातंत्र्ययुद्धापासून अरब राष्ट्रांविरोधाती कडव्या लढाईपर्यंत प्रत्येक संग्रामात आघाडीवर राहून नेतृत्व करणारे शेरॉन इस्रायलमध्ये `मि. सिक्युरिटी` ओळखले जात होते. सैन्यातील कमांडर ते पंतप्रधान हा त्यांचा प्रवास चित्तथरारक होता. संरक्षणमंत्रिपदी असताना शेरॉन यांनी लेबनॉनविरोधात आघाडी उघडली होती.
२००१ मध्ये शेरॉन इस्रायलच्या पंतप्रधानपदी निवडून आले. पदावर असतानाच २००६ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यापासून ते रुग्णशय्येवर होते. १ जानेवारीपासून त्यांची प्रकृती ढासळत गेली. अखेरीस शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
इस्रायलचे ११ वे पंतप्रधान असलेल्या शेरॉन यांच्या मृतदेहावर पंतप्रधान कार्यालयातर्फे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.