वॉशिंग्टन: मन शुद्धीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना 'चहा'गिफ्ट देण्यात आला आहे. कोलकात्यातील TE-A-ME चहा कंपनीने अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मनशुद्धीसाठी ६ हजार पिशव्या चहा पाठविला आहे.
ट्रम्प यांचे दूषित मन शुद्ध करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले असून, शुद्धीकरणाची वेळ टळून गेलेली नाही, असा इशाराही ट्रम्प यांना दिला आहे.
या चहाच्या पिशव्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ट्रम्प यांच्या प्रचार यंत्रणेने उत्तर दिले नाही.
कोलकत्यातील 'टे-ए-मी' या चहाच्या कंपनीने या टीबॅग पाठविल्या आहेत. 'ट्रम्प यांना भारतातून नमस्कार, तुम्हाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक 'ग्रीन टी' पाठविला आहे. घातक घटकांना हा चहा प्रतिकार करतो. तसेच, मन आणि तन शुद्धीस मदत करण्यासोबत आरोग्याचे संतुलनही ठेवतो.