सावधान! नीट वापरा फेसबूक, जाऊ शकते नोकरी

फेसबूकवर मित्र बनवले जातात, नाती बनतात-बिघडतात, नवीन संधी मिळतात, देश आणि विदेशातील माहिती मिळते, मात्र हे माहीत आहे का फेसबूकमुळे नोकरीही जाऊ शकते. 

Updated: May 7, 2015, 07:53 PM IST
सावधान! नीट वापरा फेसबूक, जाऊ शकते नोकरी title=

नवी दिल्ली: फेसबूकवर मित्र बनवले जातात, नाती बनतात-बिघडतात, नवीन संधी मिळतात, देश आणि विदेशातील माहिती मिळते, मात्र हे माहीत आहे का फेसबूकमुळे नोकरीही जाऊ शकते. 

ब्रिटीश महिला कॅटलीन वॉल्ससोबत असंच काहीसं झालं. कॅटलीन डे-केअर सेंटरमध्ये काम करत होती. आपल्या मागील नोकरीला कंटाळून कॅटलीनने नवीन नोकरी स्वीकारली होती. त्या नोकरीवर ती रुजू होणारच होती मात्र तिला त्या नोकरीला मुकावं लागलं.

काही दिवसांपूर्वी कॅटलीनने दैनंदिन कामकाजाला कंटाळून फेसबूकवर पोस्ट लिहिली होती की, 'मला डे-केअर सेंटरमध्ये काम करायला अजिबात आवडत नाही.' ही पोस्ट तिच्या मित्रांसाठी तिने लिहिली होती. मात्र तिला नोकरी दिलेल्यांना ही गोष्ट खटकली आणि त्या नवीन कंपनीने तिला नोकरीवर ठेवण्यास नकार दिला. 

त्यानंतर कॅटलीनने एका पोस्टद्वारे आपण केलेल्या चुकीबद्दल माफी मागितली. तिने लिहिलं की, 'कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मी स्वत: आई आहे आणि माझं मुलांवर प्रेम आहे.' 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.