ISISच्या पोस्टर गर्लची दहशतवाद्यांकडून हत्या

ऑस्ट्रेलियातून घरुन पळून जाऊन ISISमध्ये दाखल झालेल्या समरा केसिनोविकची (१७) हिची हत्या केल्याचे पुढे आलेय. दहशतवाद्यांनीच तिची हत्या केली. ती इसिसच्या कारभालाला कंटाळलेली होती. ती पळून जाण्याच्या तयारीत असताना तिचा गेम केला.

Reuters | Updated: Nov 25, 2015, 07:54 PM IST
ISISच्या पोस्टर गर्लची दहशतवाद्यांकडून हत्या title=

व्हिएना : ऑस्ट्रेलियातून घरुन पळून जाऊन ISISमध्ये दाखल झालेल्या समरा केसिनोविकची (१७) हिची हत्या केल्याचे पुढे आलेय. दहशतवाद्यांनीच तिची हत्या केली. ती इसिसच्या कारभालाला कंटाळलेली होती. ती पळून जाण्याच्या तयारीत असताना तिचा गेम केला.

आमचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही अल्लाच्या सेवेसाठी जात आहोत, आम्ही त्याच्यासाठी जीवही देऊ, असा संदेश आपल्या आईवडिलांसाठी सोडून समरा आणि तिची मैत्रिण सबिना सेलिमोविक (१५) या सीरियात गेल्या होत्या. 

इराक आणि सीरियातील ISIS या दहशतवादी संघटनेसाठी पोस्टर गर्लचे काम समरा करत होती. गतवर्षी ती ट्युनेशियातील आपले घर सोडून ISISमध्ये सहभागी झाली होती. मूळची समरा ही ऑस्ट्रेलियाची. दिसायला सुंदर होती. गोरा रंग, घारे डोळे यामुळे ISISने तिचा पोस्टर गर्ल म्हणून वापर केला. 

सीरियात गेलेल्या समराला ISISमध्ये करमत नव्हते. त्यामुळे ती सीरियातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. याबाबत ISISच्या दहशतवाद्यांना समजले. त्यानंतर त्यांनी तिला झोडपून काढले. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, तिची मैत्रिण सबिनाबद्दल अद्याप काहीही माहिती समजू शकली नाही. तिला समराआधीच दहशवाद्यांनी ठार केल्याची शक्यता आहे.

सीरियात ISISमध्ये सहभागी झाल्यानंतर या दोघी फेसबूकवर आपले फोटो पोस्ट करत होत्या. त्यात बुर्खा घालून हातात गन पकडलेले फोटोही त्यांनी अपलोड केले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.