आश्चर्य ! २८ वर्षानंतर येथे जन्मलं बाळ

उत्तर इटलीमधील ओसटाना या छोट्या शहराची सध्या जगभर चर्चा सुरु आहे.

Updated: Jan 31, 2016, 06:25 PM IST
आश्चर्य ! २८ वर्षानंतर येथे जन्मलं बाळ title=

रोम : उत्तर इटलीमधील ओसटाना या छोट्या शहराची सध्या जगभर चर्चा सुरु आहे. कारण काही दिवसांपूर्वी ओसटाना शहरातील तुरिन हॉस्पिटलमध्ये एक मूल जन्माला आलं.

मुल जन्माला येणं हे आपल्यासाठी नवीन नसलं तरी तेथील लोकांसाठी हे नवीनच आहे. कारण येथे गेल्या २८ वर्षानंतर मुल जन्माला आलं आहे. १९८७ मध्ये येथे याआधी मूल जन्माला आलं होतं.

ओसटाना शहरात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. एखाद्या सण-उत्सवासारखं या मुलाचा जन्म साजरा केला जात आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर करकोचा पक्षाची प्रतिकृती तयार करुन लावण्यात आली आहे.

शहराची संख्या आता 85 वर पोहोचली आहे. या लोकसंख्येतीलही अर्धीच लोकसंख्या कायमस्वरुपी ओसटानामध्ये राहतात.

दुसऱ्या महायुद्धानंतर ओसटानामधील जन्मदर कमी होत गेला. 1976 ते 1987 या वर्षांमध्ये फक्त 17 मुलांचा जन्म झाला. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी म्हणजे 2016 साली पाब्लोचा जन्म झाला आहे.