५० कार एकमेकांवर आदळल्या, ४ ठार

युरापोय देशातील स्लोव्हेनियात धुक्या दरम्यान झालेल्या अपघातात, ५० गाड्या एकमेकांवर आदळल्या, ज्यात चार लोकांचा मृत्यू झाला. 

Updated: Jan 31, 2016, 04:37 PM IST
५० कार एकमेकांवर आदळल्या, ४ ठार title=

स्लोव्हेनिया : युरापोय देशातील स्लोव्हेनियात धुक्या दरम्यान झालेल्या अपघातात, ५० गाड्या एकमेकांवर आदळल्या, ज्यात चार लोकांचा मृत्यू झाला. 

स्थानिक मीडियाने दिलेल्या बातमीनुसार, हा अपघात राजधानी ल्युबलियाना पासून एड्रियाटिक कोस्टकडे जाणाऱ्या हायवेवर झाली. या अपघातात अनेक जण जखमी आहेत, यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

बचाव कार्य करणाऱ्यांनी मदत सुरू केली आहे, अजून कळू शकलेलं नाही, वाहनांखाली किती लोक अडकले आहेत.