शरीफांसमोर आझाद बलुचिस्तान आणि 'पाकिस्तान हाय...हाय'चे नारे

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भाषणादरम्यान 'पाकिस्तान हाय हाय'चे नारे ऐकायला मिळाले. संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या बाहेर अनेक बलूच आणि भारतीय कार्यकर्त्यांनी व्यापक स्तरावर निषेध व्यक्त केला.

Updated: Sep 22, 2016, 01:44 PM IST
शरीफांसमोर आझाद बलुचिस्तान आणि 'पाकिस्तान हाय...हाय'चे नारे  title=

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भाषणादरम्यान 'पाकिस्तान हाय हाय'चे नारे ऐकायला मिळाले. संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या बाहेर अनेक बलूच आणि भारतीय कार्यकर्त्यांनी व्यापक स्तरावर निषेध व्यक्त केला.

'दहशतवादाची निर्यात'

या नारेबाजीसोबतच अनेक समुहांनी एकत्र येऊन पाकिस्तानातून भारतात होणारी 'दहशतवादाची निर्यात' बंद करण्याची मागणी केली. 

नवाझ शरीफ महासभेत भारताविषयी गरळ ओकत होते तेव्हा अनेक आंतरराष्ट्रीय संस्था महासभेच्या मुख्यालयाच्या दरवाजाबाहेर जमा झाल्या होत्या. पाकिस्तानकडून होणारे अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाची निंदा त्यांनी यावेळी केली.

'पाकिस्तान हाय हाय'

प्रदर्शन करणाऱ्यांनी 'आझाद बलूचिस्तान', 'पाकिस्तान हाय हाय', 'पाकिस्तानाच्या दहशतवादापासून जगाला वाचवा' यांसारखे अनेक नारे दिले...

'पाकला संयुक्त राष्ट्रातून हटवा'

'अमेरिकन सरकारनं पाकिस्तानला रसद पुरवणं बंद करावं', 'काश्मीरी हिंदूही मानव आहेत... त्यांच्या दु:खाकडे पाहा', 'पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रातून हटवा', 'पाकव्याप्त काश्मीरमध्ये अत्याचार बंद करा' आणि 'पाकिस्तानच्या हत्येचे क्षेत्र - सिंध आणि बलुचिस्तान' असे अनेक वाक्य यावेळी त्यांच्या बॅनर्सवर लिहिण्यात आले होते.

पाकिस्तान एक दहशतवादी देश आहे आणि पाकला बलुचिस्तानच्या लोकांना शांततेत राहू द्यायचं नाही, असं 'अमेरिकन फ्रेंडस ऑफ बलूचिस्तान' नावाच्या एका ग्रुपचे संस्थापक अहमार मुस्ती खान यांनी म्हटलंय.