ट्विटरवर ओबामा यांनी तोडला गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवर येवून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ट्विटरवर सर्वात जलद एक मिलियन फॉलोअर्स झाल्याने हा रेकॉर्ड त्यांच्या नावे झाला आहे.   

Updated: May 20, 2015, 08:41 PM IST
ट्विटरवर ओबामा यांनी तोडला गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड title=

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवर येवून गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ट्विटरवर सर्वात जलद एक मिलियन फॉलोअर्स झाल्याने हा रेकॉर्ड त्यांच्या नावे झाला आहे.   

गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या वेबसाईटवर अधिकारीक लिस्टमध्ये या रेकॉर्डला सामील केलं आहे. ओबामा यांनी अवघ्या पाच तासातच दहा लाख फॉलोअर्स मिळवले होते. 

हा रेकॉर्ड याआधी अमेरिकी अभिनेता रॉबर्ट डाउनी जूनियनच्या नावी होता. एप्रिल २०१४मध्ये रॉबर्टच्या फॉलोअर्सची संख्या अवघ्या २३ तास २२ मिनिटात दहा लाखावर पोहचली होती. 

ओबामा या सोमवारीच ट्विटरवर आले होते. त्याचं ट्विटर हॅन्डल @POTUS आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.