बेलारुसच्या लेखिका स्वेटलाना यांना नोबेल जाहीर

यंदाचे साहित्याचं नोबेल पारितोषिक जाहीर झालंय. बेलारुसच्या लेखिका स्वेटलाना अलेक्झिविच यांचा गौरव करण्यात आलाय. 

Reuters | Updated: Oct 8, 2015, 10:46 PM IST
बेलारुसच्या लेखिका स्वेटलाना यांना नोबेल जाहीर

लंडन : यंदाचे साहित्याचं नोबेल पारितोषिक जाहीर झालंय. बेलारुसच्या लेखिका स्वेटलाना अलेक्झिविच यांचा गौरव करण्यात आलाय. 

त्यांचं लिखाण म्हणजे याचना आणि  धैर्याचं मूर्तीमंत उदाहरण असल्याचं नोबेल समितीनं म्हटलंय. नोबेल पारितोषिक पटकावणा-या त्या १४ व्या महिला साहित्यिक ठरल्या आहेत. ६७ वर्षीय स्वेटलाना या पत्रकार असून त्यांनी विपूल प्रमाणात लेखन केलंय. 

स्वेटलाना यांच्या लिखाणात रशियाच्या इतिहासाचं प्रकर्षानं चित्रण करण्यात आलंय. त्यांचं लिखाण म्हणजे डॉक्युमेंट्री आणि कांदबरी यांचा सुवर्णमध्य साधणारे आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.