स्वातंत्र्यदिन : ब्रिटिश पंतप्रधानांच्या भारतीयांना शुभेच्छा

देशात ठिकठिकाणी भारताचा ६७ व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातोय... एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातायत. भारतीयांना याच दिवसाच्या शुभेच्छा ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनीही दिल्यात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 15, 2013, 12:32 PM IST

www.24taas.com झी मीडिया, लंडन
देशात ठिकठिकाणी भारताचा ६७ व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातोय... एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातायत. भारतीयांना याच दिवसाच्या शुभेच्छा ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनीही दिल्यात. यावेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची ताकद, भारताची विविधता-एकता आणि आर्थिक शक्ती याचं कौतुक केलंय.
इंग्लंडमध्ये असणाऱ्या भारतीय उच्च आयोगाच्या ‘जिमखाना’ क्लबमध्ये भारताचा ६७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा होतोय. ‘एशियन लाईट’ या लंडनच्या वृत्तपत्रानं कॅमरुन यांचा एक लेख प्रसिद्ध केलाय. यामध्ये कॅमरुन म्हणतात, सर्वात जुना स्वतंत्र देश आणि सर्वात मोठा लोकसत्ताक देश यांचे संबंध अगोदरच्या काळापासूनच चांगलं आहेत. आता ते आणखीन मजबूत करायचेत’
कॅमरून यांनी इंग्लंड आणि भारत या दोन देशांच्या नातेसंबंधांच्या वादाचाही मुद्दा उपस्थित केलाय. ‘आपले संबंध हे फक्त कटकारस्थान रचणं आणि संधीसाधूपणा करणं याच गोष्टींवर आधारीत नाही. तर हे संबंध संस्कृतीचं आदान-प्रदाण आणि वेगवेगळ्या अनुभवांनीदेखील जोडला गेलेले आहेत’. कैमरुन यांनी भविष्यात भारताबरोबर अधिक चांगले आणि मजबूत नातं तयार करण्याची इच्छा व्यक्त केलीय.
‘आताच्या या खडतर होत चालेल्या देशात आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे पण जर का आपण एकत्र झालो आणि मिळून या सर्व संकटांना तोंड दिले तर सहजपणे सर्व संकटाना सामोरे जाऊ शकतो. आतापर्यंत आपण एकत्र येऊन बरच काही मिळवलय आणि यापुढेही एकत्र येऊन त्यापेक्षाही जास्त मिळवू शकतो’ असं कॅमरुन यांनी म्हटलंय.

भारत आणि इंग्लंड यांच्या चांगल्या संबंधांवर आपल्याला अभिमान असल्याचंही कॅमरुन यांनी म्हटलंय. इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलत असताना त्यांनी भारतीय उद्योगपतींच्या योगदानाचादेखील उल्लेख केलाय. भारतातील प्रतिष्ठीत उद्योग समूह असणारा ‘टाटा ग्रुप’ हा इंग्लंडमध्येदेखील प्रचलित असल्याचं त्यांनी म्हटलंय. इंग्लंड हा भारतात प्रवेश करणारा सर्वात मोठा युरोपीयन देश आहे.
कॅमरुन यांनी इंग्लंडमध्ये स्थायिक असणाऱ्या एनआरआय समूहाचादेखील उल्लेख केलाय. कॅमरन हे इंग्लंडचे असे पाहिले प्रधानमंत्री आहेत की, ज्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी दिवाळी साजरी केली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.