जगातल्या सगळ्यात मोठ्या विमानाचं टेक ऑफ

ब्रिटननं एअरलँडर टेन नावाचं जगातलं सर्वात मोठं विमान बनवलं आहे. या विमानानं आपला पहिला प्रवास केला आहे.

Updated: Aug 19, 2016, 02:22 PM IST
जगातल्या सगळ्यात मोठ्या विमानाचं टेक ऑफ title=

लंडन : ब्रिटननं एअरलँडर टेन नावाचं जगातलं सर्वात मोठं विमान बनवलं आहे. या विमानानं आपला पहिला प्रवास केला आहे. या विमानाची लांबी 302 फूट आहे. 

जगातील आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या विमानांपेक्षा ही लांबी किमान 50 फूट अधिक आहे. आपल्या पहिल्या प्रवासात या विमानानं 15 मिनिटांत 2000 फुटांची उंची गाठली. विमान आणि हेलिकॉप्टर या दोन्ही यंत्रणांचा एकत्रित वापर करून या विमानाची रचना करण्यात आली आहे. 

हे विमान सलग पाच दिवस प्रवास करू शकतं. तसंच पायलट नसताना म्हणजेच ऑटो पायलट मोडवरदेखील सलग दोन दिवस हवेत राहू शकतं. मालवाहतूक तसंच सैनिकी वापरासाठीदेखील या विमानाचा उपयोग करता येऊ शकतो.