कैंरो : तुम्हाला असा व्हिडिओ दाखवतोय. जो तुम्हाला विचलित करु शकतो. हा व्हिडिओ अशा एका जांबाज पोलीस अधिका-याचा आहे. जो बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र जसा या जांबाज अधिका-यानं बॉम्ब हातात घेतला. तो बॉम्ब फुटला. त्यात या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.
ही घटना इजिप्तची राजधानी काहिराच्या पेट्रोल पंपावरील आहे. ज्यावेळी बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न केला जात होता त्यावेळी त्याठिकाणी काही लोक उपस्थित होते. मात्र त्यांनी मोबाईल फोनवरून या दु:खद घटनेचा व्हिडिओ बनवला.
पेट्रोल पंपवर हा व्हिडिओ अजनद मिस्र नावाच्या एका संघटनेनं ठेवल्याचा दावा केलाय. शेजारी असलेल्या पोलीस स्टेशनमधील अधिका-यांना टार्गेट करण्यासाठी हा बॉम्ब ठेवणं मुख्य उद्देश असल्याचं या संघटनेनं म्हटलंय. बॉम्ब स्फोटात तीन जण जखमीही झालेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.