रॅलीत सहभागी झाला म्हणून १९ वर्षांच्या तरुणाचं मुंडकं छाटणार

यूएईमध्ये अवघ्या १९ वर्षांच्या एका तरुणाचं मुंडकं छाटून त्याला सुळावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली... या मुलाचा गुन्हा इतकाच की त्यानं सरकारविरुद्ध आयोजित केलेल्या एका रॅलीत सहभाग घेतला होता.

Updated: Dec 18, 2015, 05:42 PM IST
रॅलीत सहभागी झाला म्हणून १९ वर्षांच्या तरुणाचं मुंडकं छाटणार title=

दुबई : यूएईमध्ये अवघ्या १९ वर्षांच्या एका तरुणाचं मुंडकं छाटून त्याला सुळावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली... या मुलाचा गुन्हा इतकाच की त्यानं सरकारविरुद्ध आयोजित केलेल्या एका रॅलीत सहभाग घेतला होता.

यूएईमध्ये १०१२ मध्ये सरकारविरुद्ध आंदोलन करणाऱ्या ५१ लोकांना अटक करण्यात आली होती. यामध्ये एका १५ वर्षांच्या मुलाचाही सहभाग होता. या मुलाचं नाव आहे अब्दुल अल-जहर असं आहे. अब्दुल आता १९ वर्षांचा आहे... आणि अजूनही तुरुंगात असलेल्या अब्दुलला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

आपल्या मुलाला एवढ्या छोट्या गुन्ह्याासाठी इतकी मोठी शिक्षा झाल्याचं समजल्यानंतर त्याच्या वडिलांनी जगासमोर आपलं गाऱ्हाणं मांडलंय. आपल्या मुलाला मदत करण्याची विनंती त्यांनी केलीय. एका रॅलीमध्ये सहभागी होण्याची शिक्षा 'मृत्यूदंड' कशी काय असू शकते, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. 

शिक्षेनुसार, पहिल्यांदा अब्दुलचं मुंडकं छाटण्यात येणार आहे... आणि त्यानंतर त्याला सुळावर लटकावण्यात येणार आहे. ही शिक्षा त्याला गेल्या ऑक्टोबर महिन्यात सुनावण्यात आलीय. 

एमनेस्टी इंटरनॅशनलच्या एका अहवालानुसार, सौदी अरबमध्ये वर्षांच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये तब्बल १०२ लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x