स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेची माफी

खातेदारांना कर चोरी करण्यास मदत केल्याने एचएसबीसीने माफी मागितली आहे. ही माफी स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेने माफी मागितली आहे.  

Updated: Feb 16, 2015, 12:11 AM IST
स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेची माफी title=

नवी दिल्ली : खातेदारांना कर चोरी करण्यास मदत केल्याने एचएसबीसीने माफी मागितली आहे. ही माफी स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी बँकेने माफी मागितली आहे.  

खातेदारांना कर चोरीप्रकरणी मदत केल्याचा एचएसबीसी बँकेवर आरोप केले गेले आहेत. ब्रिटनमधील काही वर्तमानपत्रांमध्ये ही माफी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

माफी पत्रावर एचएसबीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट गुलिवर यांची स्वाक्षरीही आहे.एचएसबीसीतील काळ्या पैशाचे आकडे उघड कऱणारा हर्व फाल्सियानीचे म्हणणे आहे की, हे प्रकरण ब्रिटन सरकारला २०१० सालीच माहिती पडायला हवे होते.

टॅक्स अधिकाऱ्यांना प्रकरणाचा छडा लावण्यास अपयश येत असल्याचा आरोप ब्रिटनमधील संसदेच्या सदस्यांनी केला आहे.

महसूल आणि सीमा शुल्क विभागाने नुकतीच पोलिस आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर सुरु करण्याबाबतही चर्चा केली. ब्रिटनमधील संसदेच्या वित्तीय विभागाची एक समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.