बोस्टन: ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानात त्यावेळी खूप गोंधळ माजला. जेव्हा दारूच्या नशेत एका महिला प्रवाशानं आपल्यासोबत अनेकांचे प्राण संकटात टाकले. मात्र तेव्हा पायलटनं घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार ही महिला प्रवासी नशेच्या धुंदीत स्वत:वरील ताबा घालवून बसली आणि सरळ जबरदस्तीनं कॉकपिटमध्ये शिरली. तिनं कॉकपिटचा दरवाजा उघडताच इतर प्रवाशांनी तिला थांबवलं आणि महिलेनं गोंधळ सुरू केलं. यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.
मैसाच्यूसेट्स राज्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला प्रवाशाला अटक करण्यात आलीय. ब्रिटिश एअरवेजकडून आलेल्या वक्तव्यानुसार, ही महिला मंगळवारी २१३ या विमानाच्या कॉकपिटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागली. विमानाला बोस्टनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन वेळेनुसार दुपारी दीड वाजता उतरायचं होतं. मात्र त्याला अर्ध्यातासापूर्वीच उतरवण्यात आलं.
पोलिसांच्या एका तुकडीनं विमानातून महिलेला ताब्यात घेतलं. एअरलाइन म्हटलं, अशाप्रकारचा व्यवहार सहन केला जाणार नाही. याबाबत एअरवेजनं अजून अधिक काही सांगितलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.