‘व्हॉलिबॉल’ मॅच पाहणाऱ्या महिलेला तुरुंगवासाची शिक्षा

व्हॉलिबॉल मॅच पाहण्याची शिक्षा म्हणून एका तरुणीला तब्बल 41 दिवस तुरुंगात डांबून ठेवण्यात आलंय. ही घटना घडलीय इराणमध्ये... 

Updated: Sep 12, 2014, 05:28 PM IST
‘व्हॉलिबॉल’ मॅच पाहणाऱ्या महिलेला तुरुंगवासाची शिक्षा title=

तेहरान : व्हॉलिबॉल मॅच पाहण्याची शिक्षा म्हणून एका तरुणीला तब्बल 41 दिवस तुरुंगात डांबून ठेवण्यात आलंय. ही घटना घडलीय इराणमध्ये... 
 
1979 साली झालेल्या इस्लामिक धोरणांमुळे इराणमधील महिलांवर अनेक बंधने लादली गेली आहेत. यामध्येच, स्त्रियांना पुरुषांच्या जोडीनं स्टेडियममध्ये बसून मॅच पाहण्याचीदेखील परवानगी नाकारली गेलीय. याचाच, विरोध करण्यासाठी घवामी ही 25 वर्षांची तरुणी आणि आणखी काही इराणी महिला ‘आझादी स्टेडियम’मध्ये गेल्या होत्या. स्टेडियममध्ये पुरूष आणि महिला एका ठिकाणी एकत्र येणं हे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचं, मुख्य पोलीस अधिकारी इस्माइल अहमदी यांचं म्हणणं होतं.  

घवामी ही मूळची ब्रिटिश... तिनं आपलं कायद्याचे शिक्षण लंडनमध्ये पूर्ण केलंय. इराणमधील महिलांच्या अधिकाराच्या मागणीसाठी गेलेल्या घवामीला तेहरानमधल्या एविन जेलमध्ये 41 दिवस म्हणजे जवळपास दोन महिने एकांतात तुरूंगात डांबून ठेवण्यात आलं. घवामी ही इराण आणि इटली दरम्यान झालेला व्हॉलिबॉलचा सामाना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये घुसली होती. घवामीसोबत तिच्या या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनादेखील अटक करण्यात आली होती.  

घवामीसाठी जगभरात ‘ऑनलाईन’ कॅम्पेन...
इराणच्या या मानवाधिकारांचं उल्लंघन करणारा कायदा जगासमोर आणण्यासाठी आणि घवामीला जामीन मिळवून देण्यासाठी सोशल वेबसाईट फेसबूक आणि ट्विटरची मदत घेण्यात आली. तिच्या सुटकेसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे जगभरातून इराणवर दबाव पडला. तसेच मानवी हक्क संघटना ‘एमेनेस्टी इंटरनॅशनल’नंही या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून घवामीची अखेर सुटका करण्यात आली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.