रोजे न पाळण्याचे चीनी सरकारचे आदेश

चीन सरकारनं आपल्या शिनजियांग प्रांतात रमजान दरम्यान रोजे पाळण्यावर बंदी घातलीय.

Updated: Jul 3, 2014, 06:10 PM IST
रोजे न पाळण्याचे चीनी सरकारचे आदेश title=

बिजिंग : चीन सरकारनं आपल्या शिनजियांग प्रांतात रमजान दरम्यान रोजे पाळण्यावर बंदी घातलीय.

चीनच्या सरकारकडून शिनजियांग प्रांतातील शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये रोजे पाळण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले गेलेत. या आदेशानुसार, शाळांतील विद्यार्थी आणि सरकारी कर्मचारी मुस्लिम समाजात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात रोजे पाळण्याची परवानगी नाकारण्यात आलीय. 

यापूर्वी, या भागात स्थानिक सररकारनंही कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याच्या कारण देऊन रोजे न पाळण्याविषयी सूचना केल्या होत्या. देशातील पूर्वोत्तर भागातील शिनजियांग प्रांतात उइगर मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

रोजे पाळताना प्रार्थना सभा आणि धार्मिक सभांमधून लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती चीनी सरकारला वाटतेय... त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचं मानलं जातंय.  

पेईचिंगच्या पब्लिक सिक्युरिटी ब्युरोनं दिलेल्या इशाऱ्यानंतर रोजे पाळण्यावर बंदी आणण्याचा आदेश देण्यात आल्याचं मानलं जातंय. सरकारी टीव्ही, रेडिओवरही या बंदीबद्दल लोकांना वारंवार आठवण करून दिली जातेय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.