www.24taas.com, झी मीडिया, लंडन
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू साथीदार आणि मुंबईमधील १९९३ च्या बॉंबस्फोटांमधील प्रमुख आरोपी इक्बावल मिर्ची याचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिर्चीचा लंडनमधे मृत्यू झाल्याची माहिती आहे.
लंडनच्या हॉर्न चर्च परिसरात एक्सेस टाऊन भागात एका आलिशान घरात मिर्चीचं वास्तव्य होतं. २० वर्षे परदेशात असलेल्या मिर्चीला भारतात आणण्यासाठी भारतीय तपाससंस्था प्रयत्न करत होत्या. लंडनमध्ये त्याला अटकही झाली होती. त्यावेळी त्याच्या त्याला ताब्यात घेण्यासाठी भारतानं प्रयत्न केले होते.
१९९३मध्ये झालेल्या मुंबई स्फोटात त्याचा सहभाग होता. सीबीआयनं १९९४मध्ये त्याच्याविरुद्ध इंटरपोलची "रेड कॉर्नर` नोटीसही बजावली होती. लंडन आणि दुबई इथं वास्तव्य असलेल्या इक्बाोलला २००४मध्ये अमेरिकेच्या इलिनॉईस राज्यात अटक करण्यात आली होती; मात्र त्यातून त्याची सुटका झाली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.