अमेरिकेत प्रचंड आर्थिक मंदीची भीती - ट्रम्प

अध्यक्षीय निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेमध्ये 'प्रचंड मोठी आर्थिक मंदी' येण्याची भीती व्यक्त केली आहे.

Updated: Apr 3, 2016, 06:51 PM IST
अमेरिकेत प्रचंड आर्थिक मंदीची भीती - ट्रम्प title=

न्यूयॉर्क : अध्यक्षीय निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकेमध्ये 'प्रचंड मोठी आर्थिक मंदी' येण्याची भीती व्यक्त केली आहे.

अमेरिकेमधील एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये निव्वळ एक मोठा आर्थिक बुडबुडा निर्माण झाल्याचे म्हटले आहे. 

बेरोजगारीचे मोठे प्रमाण आणि शेअर बाजारामधील वाढती तेजी यांच्या संयोगामधून अमेरिकेस आणखी एका आर्थिक मंदीचा सामना करावा लागण्याची भीती असल्याचे मत प्रतिथयश उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी व्यक्त केले.