www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोबाईल, जीन्स तसंच मुलींच्या रॉकबँन्ड विरोधात मुस्लिम संघटनांनी फतवे काढले. पण, आता सौदी अरेबियात एक असा फतवा काढला गेलाय ज्यामुळे तुम्हीदेखील हैराण व्हाल. इथल्या एका स्वयंभू मौलवीच्या म्हणण्यानुसार पतीच्या गैरहजेरीत एअर कंडीशनर चालू करणाऱ्या महिलेचं नैतिक अध:पतन होतं. त्यामुळे महिलांनी पती घरी असेल तरच एसी चालू करावा.
स्वत:ला समुदायाचा सल्लागार म्हणवून घेणाऱ्या या मौलवीनं एका ट्विटरवर लिहिलंय की, पती घरात नसताना कोणत्याही महिलेनं कूलर वेन्टीलेटर चालू केला तर तिला बाहेरून कुणी पाहू शकेल आणि नैतिकतेच्या दृष्टीनं हे योग्य नाही. सौदी अरेबियातील सुन्नी मुसलमानांचा समुदाय अजूनही बराच रुढी-परंपरावादी आहे. यापूर्वीही इथं असे बरेच फतवे काढले गेलेत.
वॉशिंग्टन टाइम्सच्या बातमीनुसार, यापूर्वी एका मौलवीनं यूट्यूब व्हिडिओ पोस्ट करून दावा केला होता की, गैर-सुन्नी आणि गैर-मुस्लिम महिलांवर बलात्कार योग्यच आहे आणि धर्मातही त्याला मान्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.