बर्मा : म्यानमारच्या लोकप्रिय नेत्या आंग सान स्यू की यांच्या गाडीच्या माजी चालकाला त्या देशाचे राष्ट्राध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.
टीन किआव असं त्यांचं नाव आहे. ६९ वर्षीय टीम किआव यांनी अर्थशास्त्रात पदवी मिळवलीय. स्यू की आणि किआव बालपणीचे मित्र आहेत. स्यू की आणि किआव यांचे शिक्षण एकत्रच झालेय. किआव सध्या स्यू की यांच्या संस्थेचे काम पाहतात.
किआव यांच्या नावाबाबत जनतेत मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत. जर किआव यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर ती ही नाममात्र असेल. कारण सर्व सूत्र की स्यू की यांच्याच हाती असतील हेही स्पष्टच आहे.