यंगून : म्यांमार या देशात पुढच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. म्यांमारमधील आंग सांग सूच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी या पक्षाने राष्ट्रपतीपदाची उमेदवारी सू यांचा जवळचा ड्राईव्हर हतनी क्याव यांना दिली आहे.
एनएलडी या पक्षाला मागच्या निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. म्यांमारमध्ये १९६० पासून सैनिक शासन आहे. आता या देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे.
हतीन क्याव हे एक चॅरिटेबल ट्रस्ट चालवतात. ज्याची स्थापना सू यांनीच केली होती. ही फाउंडेशन गरिबांना मदत करते. क्याव हे अर्थशास्त्रात पदवीधर आहेत. त्यांनी फायनान्स मंत्रालयात देखील काम केलं आहे.
राष्ट्रपतीपदासाठी दोन सदनातील २ उमेदवार आणि सैन्याचा एक उमेदवार असे ३ उमेदवार उमेदवार असणार आहेत.