VIDEO : दारुच्या नशेत तरुणीचे ड्रायव्हरशी गैरवर्तन

एका ३० वर्षीय तरुणीने रस्त्यावर दारुच्या नशेत टॅक्सी ड्रायव्हरशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. फ्लोरिडाच्या अंजली रामकिशन या व्यवसायाने डॉक्टर आहेत. व्हिडीओमध्ये दारुच्या नशेत टॅक्सी ड्रायव्हरशी गैरवर्तणूक करताना दिसतात. मियामी हेराल्डच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणानंतर त्यांना नोकरीवरुन निलंबित करण्यात आलंय. संपूर्ण व्हिडीओ पाहा

Updated: Jan 23, 2016, 01:47 PM IST
VIDEO : दारुच्या नशेत तरुणीचे ड्रायव्हरशी गैरवर्तन title=

मियामी : एका ३० वर्षीय तरुणीने रस्त्यावर दारुच्या नशेत टॅक्सी ड्रायव्हरशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. फ्लोरिडाच्या अंजली रामकिशन या व्यवसायाने डॉक्टर आहेत. व्हिडीओमध्ये दारुच्या नशेत टॅक्सी ड्रायव्हरशी गैरवर्तणूक करताना दिसतात. मियामी हेराल्डच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणानंतर त्यांना नोकरीवरुन निलंबित करण्यात आलंय. संपूर्ण व्हिडीओ पाहा

रविवारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अंजली रिझर्व्हेशन न करता कॅबमध्ये बसली. जेव्हा ड्रायव्हरने तिला टॅक्सीतून उतरण्यास सांगितले तेव्हा तिने हंगामा कऱण्यास सुरुवात केली. यावेळी तिने ड्रायव्हरशी बाचाबाचीही केली. त्यानंतर ती ड्रायव्हरच्या बाजूला असलेल्या सीटवर बसली आणि टॅक्सीतील सामान बाहेर फेकले. यादरम्यान, याप्रकरणी उबेर तपास करत आहे. 

पाहा व्हिडीओ