नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा मंडी येथे इस्राईलचं नाव घेतलं तेव्हापासून पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. यामागचं कारण असं की इस्राईल ऐवढे सर्जिकल स्टाईक अजून कोणीच केलेले नाहीत.
पाकिस्तानला आता ही चिंता सतावते आहे की, भारत देखील इस्राईलप्रमाणे त्यांच्या देशात असणाऱ्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक करेल. दाऊद इब्राहिम, मसूद अजहर आणि हाजिफ सईद सारखे दहशतवादी हे पाकिस्तानात लपून बसले आहेत. त्यांना सर्जिकल स्ट्राईक करुन भारत ठार करु शकतो.
इच्छा शक्ती ही इस्राईल सेनेची सर्वात मोठी ताकद आहे. नेते आणि नागरिकांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो. इस्राईल हा नेहमी छाती पुढे करुन लढतो. जर आमच्या देशातील एक नागरीक कोणी मारला तर आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांचे १००० माणसं मारु अशी भूमिका इस्राईल नेहमी घेतो.
आता पाकिस्तान घाबरला आहे की जर मोदींनी काही असं करु नये की ज्यामुळे पाकिस्तानात आश्रयात असलेले दहशतवादी हे जगासमोर येतील. मोदींनी जर ही माहिती जगासमोर आणली तर पाकिस्तान संकटात येईल. पाकिस्तानातील मीडियाने आधीच हे म्हटलं आहे की जर पंतप्रधान मोदींना पाकिस्तानला जगापासून वेगळा करण्याचं ठाम पणे ठरवलं तर ते तसं करुन दाखवतीलच. त्यामुळे पाकिस्तान सरकार आणि तेथील दहशतवादी मोदींच्या या पावलामुळे आधीच संकटात सापडली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करत त्यांना एकटं पाडण्याची मागणी सतत लावून धरली आहे. त्यामुळे पाकिस्तान आधीच घाबरला आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे कधीही कोणताही निर्णय घेऊ शकतात अशी भीती देखील पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सल्लागारांनी देखील व्यक्त केली होती. त्यामुळे पंतप्रधानांनी इस्राईल सेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केल्याने पाकिस्तानात सध्या खळबळ माजली आहे.