युरोपला आंब्यासह आता कारलंही कडू

युरोपमध्ये हापूस आंब्यापाठोपाठ भाज्यांवरही बंदी टाकण्यात आलीय. भारतातल्या ४ भाज्या आणि हापूस आंब्यावर ही बंदी घालण्यात आलीय.

Updated: Apr 28, 2014, 06:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
युरोपमध्ये हापूस आंब्यापाठोपाठ भाज्यांवरही बंदी टाकण्यात आलीय. भारतातल्या ४ भाज्या आणि हापूस आंब्यावर ही बंदी घालण्यात आलीय.
चार भाज्यांमध्ये पडवळ, वांगी, कारलं आणि अळूवर बंदी घालण्यात आलीय. 1 मे पासून युरोपियन युनियनकडून ही तात्पुरती बंदी घालण्यात आलीय.
ही बंदी कधी काढण्यात येईल, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
यापूर्वी चीननेही भारतातील द्राक्षांवर बंदी टाकली होती. मात्र आता चीनकडून द्राक्षांची मागणी वाढतेय.
या निर्णयामुळे भारतीय कृषी उद्योगाला मोठा फटका सोसावा लागणार आहे. भारतातून दरवर्षी सुमारे ५० कोटींहून अधिक रुपयांचे आंबे युरोपमध्ये दाखल होतात.
तर वांगी, दोडके, कारले व अळू या भाज्याही मोठ्याप्रमाणात युरोपमध्ये निर्यात केल्या जातात.
पण यंदा आंबे आणि भाज्यांमध्ये फळ माशी आढळल्याने युरोपीयन महासंघाने यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
या फळमाशीमुळे युरोपमधील ब्रिटीश टॉमेटो व काकडीच्या पिकाला लागण होऊन नुकसान होऊ शकते असे सांगितले जाते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.