फेसबूकवर या व्यक्तीच्या फोटोला लाइक केल्यावर होऊ शकते ३२ वर्षांची जेल

थायलंडचे नागरीकांनी जर देशाच्या राजाची विकृत फोटो फेसबूकवर 'लाइक केले किंवा शेअर केले तर ३२ वर्षांचा तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

Updated: Dec 14, 2015, 07:48 PM IST
फेसबूकवर या व्यक्तीच्या फोटोला लाइक केल्यावर होऊ शकते ३२ वर्षांची जेल title=

थायलंड : थायलंडचे नागरीकांनी जर देशाच्या राजाची विकृत फोटो फेसबूकवर 'लाइक केले किंवा शेअर केले तर ३२ वर्षांचा तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

'न्यूज डॉट स्काय डॉट कॉम' मार्फत शनिवारी एक बातमी प्रसिद्ध केली. त्यानुसार थनकॉर्न सिरिपाईबून या २७ वर्षीय तरुणाला राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचा विकृत फोटो आणि थाई भ्रष्टाचार कांडच्या इंफोग्राफीक फेसबूक पेजला लाइक केल्या आणि शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आले. या व्यक्तीने आपल्या ६०८ मित्रांना हा फोटो शेअर केला होता. 

या व्यक्तीवर एक भ्रष्टाचार कांडावर टीका केल्यानंतर राजाचा अपमान आणि राजद्रोहाचा आरोप लावण्याता आला. थाईलंडच्या कायद्यानुसार ८८ वर्षीय राजा सध्या आजारी आहेत. त्यामुळे त्यांचा अपमान करण्यात आला. राजाचा अपमान केल्यावर १५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा आहे. 

एका सैन्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, थनकॉर्न या नागरिकाने दोन डिसेंबरला राजाचा फोटो लाइक केला होता. त्यानंतर तो आपल्या ६०८ मित्रांना शेअर केला. सैन्याने त्याला ताब्यात घेतले. सोमवारी त्याला सैन्य कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.