www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी लावलेल्या नव्या पद्धतीच्या संशोधनानुसार, रक्ताच्या चाचणीत अनेक प्रकारच्या कर्करोगांच्या संसर्गाची माहिती मिळणार आहे.
या पद्धतीमुळे शरीराला कर्करोग झाला आहे की नाही? जर का कर्करोग झाला असेल, तर त्याचे प्रमाण किती आहे. एखाद्या व्यक्तीवर कर्करोगाचे उपचार सुरु असतील. तर ती व्यक्ती उपचारांना किती प्रतिसाद देत आहे. या सर्व गोष्टी नव्या पद्धतीच्या चाचणीवरुन कळू शकतील.
नेचर मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात नुसार असं कळतंय की, संशोधकांनी लावलेल्या शोधानुसार फुफ्फुसाचा कर्करोग हा पहिल्या टप्प्यात 50 टक्के अचूकपणे कळू शकतो.
डीएनएच्या बाजूने वाढणारे ट्यूमर यांचा शोध घेण्यास देखिल संशोधक यशस्वी झाले आहेत. तसेच फुफ्फुसाचा कर्करोग पहिल्या टप्प्यातच जाणून घेण्यास संशोधक यशस्वी झाले आहेत. असे सहायक प्राध्यापक मॅक्समिलन दियान यांनी सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.