विद्या देवी भंडारी बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

सत्तारुढ सीपीएन-यूएमएल पक्षाच्या विद्या देवी भंडारी यांची बुधवारी नेपाळच्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, विद्या देवी या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत.

Updated: Oct 29, 2015, 11:17 AM IST
विद्या देवी भंडारी बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

काठमांडू : सत्तारुढ सीपीएन-यूएमएल पक्षाच्या विद्या देवी भंडारी यांची बुधवारी नेपाळच्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, विद्या देवी या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत.

विद्या देवी यांनी नेपाळी काँग्रेसच्या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला 100 हून अधिक मतांना मागे टाकलं. निवडणुकीत त्यांनी 327 मतं मिळवली... तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि नेपाळी काँग्रेसचे वरीष्ठ नेते कुल बहादूर गुरुंग यांना 214 मतं मिळाली. 

54 वर्षीय भंडारी सीपीएन-यूएमएलच्या उपाध्यक्ष आणि पक्षाच्या दिवंगत महासचिव मदन भंडारी यांच्या पत्नी आहेत. 

विद्या या सद्य राष्ट्रपती रामबरन यादव यांची जागा घेणार आहेत. नेपाळला एक गणराज्य म्हणून घोषित केल्यानंतर 2008 मध्ये देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून रामबरन यांची निवड झाली होती. 

गेल्या 20 सप्टेंबरला संविधान लागू झाल्यासोबतच संसदेचं सत्र सुरू झाल्यानंतर एका महिन्यातच नवीन राष्ट्रपतींची निवड होणं गरजेचं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x