भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय सुरू

फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेत. नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परराष्ट्र राज्यमंत्री परिणित कौर यांनी त्यांचं स्वागत केलं.

Updated: Feb 14, 2013, 06:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेत. नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परराष्ट्र राज्यमंत्री परिणित कौर यांनी त्यांचं स्वागत केलं.
फ्रान्सच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ओलांद यांची ही पहिलीच भारत भेट आहे. या दौ-यात अणुऊर्जा आणि संरक्षण करारांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसंच दोन्ही देशांतला व्यापार वाढवण्यावरही चर्चा होईल. ओलांद यांच्या या भेटीनं भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय सुरू होणार आहे.