www.24taas.com , वृत्तसंस्था, मेलबर्न
सोनं का झाडाला लागतं का?, असं उपहासात्मक वाक्य आपल्यापैकी प्रत्येकाच्या तोंडून कधी ना कधी निघालंच असेल. मात्र हो खरंच सोनं झाडाला लागलंय. ऑस्ट्रेलिया सोन्याची झाडं उगवली आहेत, असं म्हणण्याची वेळ आलीय.
ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांना एक नवा शोध लागलाय. ऑस्ट्रेलियातल्या ज्या भागांमध्ये नीलगिरीची झाडं आहेत. त्या झाडांमध्ये सोन्याचे अंश आढळल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. `कॉमनवेल्थ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशननं (सीएसआयआरओ) पश्चिम ऑस्ट्रेलियातील कालगुर्ली या प्रदेशात हे संशोधन केलंय. पश्चिम ऑस्ट्रेलियात असलेल्या या प्रदेशामध्ये सोन्याच्या खाणी आहेत. याच खाणींमधले सोन्याचे कण नीलगिरीची झाडं शोषून घेत असल्याचं संशोधनामध्ये दिसून आलंय. त्यामुळं या झाडांमध्ये सोनेरी कळाही दिसू लागलीय.
नीलगिरीच्या झाडांनी भूगर्भातून ३० मीटर खोलीवरून (१०० फूट) सोन्याचे कण शोषून घेतल्याचं निरीक्षण मेल लिंटर्न या भूगर्भरसायनतज्ज्ञानं नोंदवलंय. दहा मजली इमारती एवढं हे अंतर आहे. त्या परिसरात असलेल्या नीलगिरीच्या झाडांची मुळं खोलवर जाऊन सोन्याचा अंश असलेलं पाणी शोषून घेतात. एखादा पंप जसं पाणी खेचतो तसंच हे कार्य...त्यातलं उपयुक्त असं पाणी मुळं आपल्याकडे शोषून घेतात आणि त्यातले सोन्याचे कण हे झाडातील यंत्रणा पाने आणि फांद्याकडे पाठवून देतात... सोनं झाडाकरता विषरी ठरू शकतात म्हणून मग ती सोन्याचे कण असलेली पानं गळून पडतात, अशी माहिती भूगर्भरसायनतज्ज्ञानं दिलीय.
सध्या भारतातल्या उन्नावमध्ये एका साधुला आलेल्या स्वप्नावरुन खजिन्याचा शोध घेतला जातोय. सोनं शोधण्यासाठी सरकार कामी लागलंय. मात्र ऑस्ट्रेलियात तर निसर्गानंच किमया केलीय आणि झाडालाच सोनं उगवू लागलंय... याला स्वप्न म्हणायचं की चमत्कार!
पाहा व्हिडिओ
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.