62 वर्षीय इमरान खान पुन्हा एकदा 'गुपचूपपणे' बोहल्यावर....

पाकिस्तानच्या क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या मैदानात उतरलेला इमरान खान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्याची माहिती मिळतेय. इमराननं बीसीसीची माजी अँकर रेहाम खान हिच्याशी गुपचूप निकाह केलाय. 

Updated: Jan 1, 2015, 06:50 PM IST
62 वर्षीय इमरान खान पुन्हा एकदा 'गुपचूपपणे' बोहल्यावर.... title=

कराची : पाकिस्तानच्या क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या मैदानात उतरलेला इमरान खान पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकल्याची माहिती मिळतेय. इमराननं बीसीसीची माजी अँकर रेहाम खान हिच्याशी गुपचूप निकाह केलाय. 

मीडिया रिपोर्टनुसार, 62 वर्षीय इमरान खाननं पाकिस्तानी बातम्या देणाऱ्या अँकर असलेल्या 41 वर्षीय रेहाम हिच्याशी गेल्या आठवड्यात निकाह रचलाय. 

रेहाम ही घटस्फोटिता आहे तसंच ती तीन मुलांची आईदेखील आहे. अगोदरच्या लग्नानंतर, रेहान ब्रिटनमध्ये राहत होती. तेव्हा ती बीबीसी क्षेत्रीय कार्यक्रम 'साऊथ टुडे'मध्ये हवामानाची माहिती देत होती. 

तर, इमराननं यापूर्वी जेमिमा गोल्डस्मिथ खान हिच्याशी निकाह रचला होता. या दोघांची सुलेमान ईसा आणि कासिम असे दोन मुलंही आहे. या जो़डप्यानं 2004 मध्ये घटस्फोट घेतला होता. 

यानंतर, जेमिमानं आपल्या नावातून 'खान' हे आडनाव हटवण्याचा निर्णय या ऑक्टोबरमध्ये घेतला होता. इमरानला पुन्हा एकदा बोहल्यावर चढायचं असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं तिनं म्हटलं होतं. 

इमरानच्या एका कौटुंबिक मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, इमरानच्या बहिणीसहित त्याचे इतर नातेवाईकदेखील इमरानच्या या निर्णयाच्या विरोधात होते. त्यामुळे, त्यानं गुपचूप लग्न केलं असावं.

इमरान आणि रेहाम  यांनी आपल्या लग्नाची अधिकृतरित्या घोषणा केलेली नसली... तरी त्यांनी या बातमीचं खंडनही केलेलं नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x