लंडन : बँकींग क्षेत्रातील 'एचएसबीसी'नं ब्राझील आणि तुर्की इथलं आपलं बस्तान गुंडाळायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या जवळपास 50 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जाणार आहे, तशी घोषणाच बँकेनं केलीय.
यासोबतच, कंपनीला आपलं मुख्यालय आता आशिया खंडात स्थानांतरित करण्याचा विचार करत आहे. युरोप खंडातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचएसबीसीचा येत्या अडीच वर्षांत आपली वार्षिक गुंतवणूक पाच अरब डॉलरपर्यंत कमी करण्याचा मानस आहे.
बँकेच्या म्हणण्यानुसार, कंपनीला आशियावर विशेष लक्ष केंद्रीत करायचंय. जगभरात आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 22 हजार ते 25 हजारापर्यंत कपात कंपनीला करायचीय. याशिवाय तुर्की आणि ब्राझीलमधला आपल्या व्यावसायाच्या विक्रीतून 25 हजार आणखी रोजगार कमी होतील.
बाजार मूल्यानुसार युरोपच्या या सर्वात मोठ्या बँकेनं आशियाई अर्थव्यवस्थांमध्ये संचालन 150 वर्षांपूर्वीपासून सुरू केलंय. उल्लेखनीय म्हणजे, एचएसबीसीचा आशियात एव्हाना चांगलाच जम बसलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.